Wednesday, July 12, 2023

मन की कहानी आखों की जुबानी

आपलं आणि आपल्या मनाचं एक वेगळंच नातं असतं. इतर कुठल्याही नात्यापेक्षा ते जरा वेगळंच असतं.
आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपण इतरांपेक्षाही आपल्या "त्या" मनाचं जास्त ऐकतो. 
गद्धे पंचविशीतला दुसरा टप्पा म्हणजे प्रेमाला नात्याचे नाव देणे. हा नुसता एक milestone नसुन ती एक प्रोसेस आहे.
मनातल्या गोष्टी बऱ्याचदा डोळ्यांनी बोलता येत नाहीत पण डोळ्यांनी सांगितलेल्या गोष्टी मनापर्यंत नक्की पोहोचतात.
कदाचित हा अनुभव सगळ्यांनाच येत असावा !

फेसबुकच्या वॉल वरुन मनाच्या कोपऱ्यात आली
थोडेच दिवसात तिकडे तिचे घर करून गेली

मनातले विचार सांगायला आता मनच घाबरत होतं
डोळ्यातले भाव कळतील का याची वाट बघत होतं

कळलेलं तर तिला सगळंच होतं, वळतंय की नाही हे ठरत होतं
पण तरी सुद्धा तिचं मन माझ्याचसाठी झुरत होतं

मनातले खेळ संपून शेवटी घराच्या भिंतीत आले
आई बाबा आजी आजोबा सगळ्यांनीच "हो" म्हटले

चार महिन्यात साखरपुडा आणि नंतर लगेच लग्न ठरले
मनाच्या कोपऱ्यात आता वेगळेच वादळ चालू झाले

दोघांच्या मनातली वादळं आता अधे मधे भिडू लागली
Fear of unknown च्या नावाखाली शांतही होऊ लागली

मनात entry मारताना हे fear of unknown नव्हतं?
की आता सगळं known झाल्यावर fear च unknown होतं?

शेवटी एकदा मुहूर्तावर जोरदार चौघडे वाजले
सनईच्या सुरांनी मन जरा प्रसन्न झाले

आठवड्याभरात मन पुन्हा normal routine वर आले
मनातला विचार सांगायला पुन्हा घाबरु लागले

थोडेच दिवसात eye contact चे ट्रेनिंग देखील पूर्ण झाले
माझ्या मनाला हळू हळू तिच्या डोळ्यातले भाव कळू लागले

"डोळ्यांची भाषा" हेच त्रिवार सत्य असतं, 
म्हणूनच म्हणतो, मन म्हणजे मन म्हणजे मन असतं तुमचं आणि आमचं सेम च असतं..!


मंगेश केळकर 
१२-जुलै-२०२३

No comments:

Post a Comment