Thursday, August 4, 2011

तिचं असणं...

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ नक्कीच येते जेव्हा त्याला "तिचं असणं" खूप हवंहवंसं वाटतं.. तिच्या सोबत असण्याची, तिला भेटण्याची कारणं मन शोधायला लगतं.. खरंतर कारणं कित्येक असतात, पण नक्की कोणतं हे कळंत नसतं.. 

खरंच, तेव्हा "तिचं असणं" हेच फक्त महत्त्वाचं असतं..तुझं असणं म्हणजे क्षितीजासारखं,
जवळ यावं म्हटलं तर दूर जातेस, आणि थांबून राहिलो तर आशेनी बघत राहतेस...

तुझं असणं म्हणजे संधीप्रकाश,
मावळतीच्या सूर्याकडे पहाटेच्या आशेने बघणारी सुंदर संध्याकाळ...

तुझं असणं म्हणजे इंद्रधनुष्य,
सप्तरंगी आकाशाचं उलगडणारं रहस्य...

तुझं असणं म्हणजे ओल्या मातीचा गंध,
चातकाची ती ओढ अन्पहिल्या पावसातुन मिळणारा निखळ आनंद...

ह्या तुझ्या असण्यासाठीच मी जगतोय,
कधी येशील गं तू, तुझी वाट पाहतोय...


                  -मंगेश केळकर

3 comments: