Tuesday, December 31, 2024

माझं तर ठरलंय..


माझं तर ठरलंय, यंदा "पुन्हा" फिट व्हायचं,
जानेवारी उजाडताच जिम ची मेंबरशिप घेऊन यायचं.
(१ वर्षाची बरं का)

माझं तर ठरलंय, यंदा "पुन्हा" छान डाएट करायचं,
७ किलो कमी करून फार फार तर ३ च वाढवायचं
(मागच्या वर्षी ५ ने कमी करून ७ ने वाढवलं होतं)

माझं तर ठरलंय, रोज "पुन्हा" नियमितपणे ५ वाजता उठायचं,
स्नुझचं बटण फार तर ३ वेळाच दबायचं 
(मागच्या वर्षी ६-७ वेळा दाबलं जात होतं)

माझं तर ठरलंय, यंदा "पुन्हा" पैश्यांची बचत करायची
अमेझॉन वर खरेदी फक्त ग्रेट इंडीयन फेस्टिवललाच करायची
(मागच्या वर्षी दर महिन्याला व्हायची)

माझं तर ठरलंय, फॅमिली सोबत दर रविवारी बाहेर पडायचं,
स्विगी zomato वर ऑर्डर न करता डायरेक्ट हॉटेल मध्येच जाऊन खायचं
(मागच्या वर्षी घरीच पार्ट्या केल्या)

माझं तर ठरलंय, रोज झोपण्यापूर्वी थोडं तरी वाचन करायचं
झोप येत नसेल तर एक पुस्तक हातात घ्यायचं
(मागच्या वर्षी वाचू म्हणून ठरवलेली पुस्तकं त्या निमित्ताने बाहेर तरी पडतील)

माझं तर ठरलंय, रोज स्वत:ला आरश्यात बघायचं,
आणि "उद्या पासून नक्की" असं confidently म्हणायचं..

इति -
मंगेश केळकर
३१-डिसेंबर-२०२४